जामठी- महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक संघटनेच्या बोदवड तालुका शाखेतर्फे ग्रामपंचायतस्तरीय आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या मागण्यांसंदर्भात बोदवड पंचायत समिती कार्यालयासमोर बुधवारी सकाळी 11 वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली. संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
या मागण्यांसाठी उपोषण
सर्व ग्रामपंचायतींनी आपले सरकार सेवा केंद्राकामी 14 व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीतून आरटीजीएस करण्यात यावेत, ग्रामपंचायतस्तरीय आपले सरकार सेवा केंद्र चालकांना महिन्याच्या निश्चित तारखेस पगार अदा करण्यात यावेत तसेच आवास प्लस या स्वॉप्टवेअरच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ऑनलाईन पध्दतीने घरकूलाचा सर्व्हे करणार्या डेटा एन्ट्री ऑपरेटरांचे मानधन तत्काळ अदा करावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यांचा उपोषणात सहभाग
उपोषणास संघटनेचे जिल्हा सचिव जितेंद्र माळी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल मोरे यांच्यासह असंख्य नागरीकांनी भेट दिली. उपोषणकर्त्यांमध्ये तालुकाध्यक्ष श्रावण बोदडे, उपाध्यक्ष अमोल अशोक तायडे, सचिव लिना चौधरी, कार्याध्यक्ष विठ्ठल सुशीर, संघटक जनार्दन गायकवाड, सहसचिव नितीन महाजन, सदस्य सुनील इंगळे, सुनील पाटील, योगेश भागवत पाटील, विकास माळी, योगेश घनोकर, योगेश जगन्नाथ पाटील, श्रीकृष्ण पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक सहभागी झाले आहेत.