भुसावळ – बोदवड शहरातील चालक व तक्रारदार संदीप बापू देवकर (24) यांच्यावर तिघांनी चाकू हल्ला केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी अंकुश साहेबराव पाटील व अन्य दोन अनोळखी इसमांबाबत बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक गोपाळ गव्हाळे करीत आहेत.