दोघा शिक्षकांविरुद्ध गुन्हा ; मारहाणीत विद्यार्थी जखमी
बोदवड- शहरातील चंद्रकांत बढे उर्दू हायस्कुलमध्ये आठवीत शिकणार्या 14 वर्षीय विद्यार्थ्यास शिक्षकाकडूनच शाळेत बेदम मारहाण झाल्याने पालकवर्गातून या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. या शिक्षकाविरुद्ध बोदवड पोलिसात मंगळवारी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
किरकोळ कारणातून मारहाण
शहरातील चंद्रकांत बढे उर्दू हायस्कुलमधील आठवीचा विद्यार्थी जुनेद शेख मुतल्लीफ शेख भिरून (14) याने मंगळवारी सकाळी वर्गातील विद्यार्थ्याकडून पेन मागितल्याचा शिक्षक मुक्तार बेग नजीर बेग (रा.बागवान मोहल्ला, बोदवड) व शे.इम्रान शे.सुलतान (जाम मोहल्ला, भुसावळ) यांना राग आल्याने दोघा शिक्षकांनी विद्यार्थ्यास बेदम मारहाण केली. विद्यार्थ्याचे केस पकडून चापटा-बुक्क्याने गालावर तसेच पाठीवर मारहाण करून व तुमच्याकडून काय होईल ते करून घ्या? असा विद्यार्थ्यांस दम देण्यात आला. या प्रकरणी बोदवड दोघाही शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शिक्षकांकडे गुरू म्हणून पाहिलेे जाते मात्र गुरू-शिष्याच्या नात्याला या शिक्षकांनी काळीमा फासल्याची टिका होत आहे.