बोदवड तालुक्यातील तीन दारू दुकानांना सील

0

बोदवड : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन तसेच संचारबंदी सुरू असतनाही बोदवडमध्ये बेकायदा दारू विक्री होत होती. या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाई करण्यासंदर्भात कळवल्यानंतर मंगळवारी तीन दुकानांना सील लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

तीन दुकानांवर झाली कारवाई
शहरातील दोन देशी दारुचे दुकानासह एका वाईन शॉपीवर विभागीय निरीक्षक आय.एन.वाघ, संतोष निकम, विपुल राजपूत आदींनी सील ठोकले. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात होणारी चोरटी दारूची विक्री थांबवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.