बोदवड। बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या कामाला महिनाभरापुर्वी सुरूवात झाली आहे. सध्या जुनोना धरणाच्या कामासाठी खंदक खोदला जात आहे. त्यासाठी 13 पोकलॅण्ड, 10 व्हॅगन ड्रील मशीन दाखल झाल्या असून 30 डंपरद्वारे खोदकामाला गती देण्यात आली आहे.
उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरूवात झाल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शासकीय निविदेनुसार आगामी दोन वर्षात योजनेचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या जुनोने धरणाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. दोन टप्प्यातील या कामाचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे.
खंदकाचे खोदकाम झाल्यानंतर भिंतीचे बांधकाम होार आहे. काळी माती टाकून भिंतीच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. सहा महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, योजनेमुळे उपसासिंचन योजनेमुळे बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, मलकापूर या तालुक्यांमधील 101 गावांना लाभ मिळणार आहे.