बोदवड शहरातून 50 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली

0

बोदवड- शहरातील शारदा कॉलनीजवळ बडगुजर बिल्डींग मटेरीअल या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 50 हजारांची रोकड लांबवल्याची घटना 4 मे ते 5 रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान घडली. दुकानातील कामाला असणार्‍या लोकांकडे विचारणा केल्यानंतरही रकमेचा शोध न लागल्याने बुधवार, 27 रोजी सायंकाळी या प्रकरणी दुकान मालक प्रमोद सुरेश बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.