बोदवड : कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी तालुका प्रशासन अयस्वी ठरत आहे. शहरांत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघण होत असल्याच्या तक्रार वाढल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बोदवड तहसील कार्यालयात आढावा बैठक झाली. तत्पूर्वी तहसील आवारात नगरपंचायतीच्या आठ घंट्यागाड्यांचे नगराध्यक्षांच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत लोकार्पण करण्यात आले.
जनजागृतीबाबत केल्या सूचना
तहसीलदार रवींद्र जोगी, गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, पोलिस निरीक्षक सुनील खरे, महावितरणचे उपअभियंता राठोड उपस्थित होते. यावेळी शहरात होणार्या गर्दीच्या नियंत्रणासाठी प्रशासन अयशस्वी ठरत असल्याने दुकानदार, भाजीपाला,- फळ विक्रेते व ईतर लोकांना विशिष्ट जागा व वेळापत्रक ठरवून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करून सोशल डिस्टन्स व तोंडाला मास्क लावण्याबाबत जनजागृृृती करण्याबाबत सुचना केल्या. यासंदर्भात परत तीन दिवस शहरात जणता कर्फ्यू पाळण्यात यावा याबाबत अधिकार्यांशी संवाद साधण्यात आला. शुक्रवार , शनिवार व रविवार या तीन दिवशी शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी सांगितले.
तहसीलदारांना दिले कारवाईचे आदेश
आढावा बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी नागरीकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यात कोरोना संदर्भात तपासणी व फिटनेस सर्टिफिकेटसाठी फी घेतली जात असल्याची तक्रार महिलेकडून करण्यात आली. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार यांना या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. बोदवड ग्रामीण रुग्णालयात पीपीई किट उपलब्ध नसल्याचे येथील वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितल्यानंतर आमदारांनी कोव्हिड सेंटर व आरोग्य विभागासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्यात यावे या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांना भ्रमणध्वनीद्वारे सुचना करत बोदवड आरोग्य विभागाला 100 पीपीई कीट, ऑक्सिजन सिलेंडर , ईन्फ्रारेड थर्मोमिटर व त्यासोबत सर्व आवश्यक असलेले साहित्य लवकरात लवकर करून करून देण्याच्या सूचना केल्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मनोहर खैरनार, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, नगराध्यक्ष मुमताजबी बागवान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक देवेंद्र खेवलकर, नगरसेवक विजय पालवे, शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी, शहप्रमुख हर्षल बडगुजर, कलिम शेख, दीपक माळी, सागर पाटील यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.