बोदवड : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून या कोरोना संसर्गाच्या खबरदारीसाठी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्याकडून शहरात ठिकठिकाणी तीन मिटर अंतर ठेवत वर्तुळ आखून सोशल डिस्टन्स इन मेडिकल, दूध डेअरी, अत्यावश्यक सुविधा पुरविणार्या दुकानांसमोरील ग्राहकांसाठी विशेष उपाय योजना म्हणून व कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सचा अभिनव उपक्रम शहरात राबविण्यात आला. शहरातील अत्यावश्यक सुविधा पुरवित असलेल्या दुकानांसमोर त्याचंबरोबर भाजी मार्केटमध्ये जातांना विशेष खबरदारी कशी घ्यावी? याबाबत प्रा.पाटील यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून ‘घरातच रहा, सुरक्षित रहा’ असा संदेश देत व आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
व्यापारी व नागरीकांमध्ये जनजागृती
प्रा.हितेश पाटील यांच्याकडून दुकानांच्यासमोर खडूने सर्कल आखून व्यापार्यांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून मेडिकल,भाजीपाला,फळे तसेच दूध डेअरीसमोर होणार्या गर्दीतून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रा.हितेश पाटील यांच्यावतीने सोशल डिस्टन्स हा अभिनव उपक्रम संपुर्ण शहरात राबविण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता सामाजिक बांधीलकी म्हणून प्रा.हितेश पाटील यांच्यातर्फे दुकानांसमोर व नागरीकांमध्ये जनजागृती करून खडूने सर्कल आखून ‘सोशल डिस्टन्स’ हा अभिनव उपक्रम राबविला. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख मेहबूब, दीपक माळी, कलीम बागवान, कय्युम बागवान उपस्थित होते.