सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव – तालुक्यातील बोरनार येथील ग्रामस्थांच्या सोईसाठी सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकाना निर्देश देवुन केलेल्या पाठपुराव्यामुळे बोरनार ते जामनेर या बससेवेला सुरुवात झाली आहे. जळगाव तालुक्यातील बोरनार या गावामधील नागरिकांनी दैनंदिन बाजार तसेच विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणुन जामनेरला ये-जा करण्यासाठी बससेवा सुरू व्हावी, अशी मागणी मागील बर्याच दिवसांपासून केली होती. या मागणीकडे राज्य परिवहन मंडळाच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर बोरनार वासियांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून जामनेरसाठी बससेवा सुरु करण्याची मागणी केली.
राज्यमंत्री पाटील यांनी नागरिकांच्या अडचणीची तातडीने दखल घेऊन जळगाव येथील विभागिय वाहतूक नियंत्रकांकडे पाठपुरावा केला. राज्यमंत्री पाटील यांच्या निर्देशानुसार जामनेर ते बोरनार ही बस सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, बोरनार येथे आज नागरिकांनी मोठ्या ऊत्साहात बसचे स्वागत केले. वाहक व चालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. ही बस जामनेर येथून 10 वाजता सुटेल तर बोरनार येथे 11 वाजता पोहचणार आहे. यावेळी पं.स.सदस्य चावदास कोळी, माजी सरपंच विष्णू चिंचोरे, बापू थोरात, शिवसेना विभागप्रमुख सुनिल बडगुजर, शाखाप्रमुख सुनिल मराठे, सरपंच भगवान भील, उपसरपंच सुरेश कोळी, दिनकर देशमुख, युवराज देशमुख, पुंडलीक कोळी, विनायक चौधरी, प्रमोद बडगुजर, मधुकर बडगुजर, सागर चौधरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.