बोराडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

0

शिरपूर: सध्या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या शतकापार गेली असून मात्र संकट अजून टळले नाही. ही बाब नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. अशातच बोराडी येथील एसबीआय बँक ऑफ इंडियासमोर विविध योजनेअंतर्गत आपल्या खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बँकेमार्फत नागरिकांच्या आरोग्याला लक्षात घेता कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसुन आले नाही.

बँकेसमोर नागरिकांची अशीच अलोट गर्दी असते. स्थानिक बँकेने नागरिकांना बसण्यासाठी आणि सावलीची तसेच पाणी पिण्याची सोय केली नाही.तर विशिष्ट अंतरावर उभे राहण्यासाठी खुणा तयार करणेही गरजेचे होते. मात्र तसे न करता भर उन्हात नागरिकांना चटके खात उभे रहावे लागत आहे.बँकेने जरी सोशल डिस्टनसिंग करिता खुणा तयार केल्या नसून आता सोशल डिस्टन्सिंगकडे स्थानिक बँक प्रशासन गंभीरपणे लक्ष देणार का ? की हा असाच प्रकार पुढे सुद्धा सुरुच राहील?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बँकेच्या व्यवस्थापकांचा खातेदारांशी उर्मटपणा

सध्या तालुक्यात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्यात वाढत आहेत. अशात नागरिकांसह प्रशासनानेसुद्धा या बाबींकडे गंभीररित्या लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच बँकेत जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली एक एक तास बँक बंद ठेवले जात असून असा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.बँकेचे व्यवस्थापक यांनी शासनाच्या नियमांना धाब्यावर ठेऊन स्वतः मास्क न लावता खातेदाराच्या समस्या सोडवत आहे, असे खातेदारांचे म्हणणे आहे. बँकेत सॅनिटाईझर उपलब्ध नसून व्यवस्थापक लक्ष देत नाहीत. गेल्या कित्येक दिवसापासून ही समस्या अशीच आहे असे खातेदारांचे म्हणणे आहे.बँकेचे व्यवस्थापक खातेदारांशी उर्मटपणे बोलतात. तसेच आदिवासी भागात शिक्षण कमी असलेल्या नागरिकांना तुम्हाला समजत नाहीत तर कश्याला बँकेत येतात, असे ते हिंदी भाषेत बोलतात असे खातेदारांचे म्हणणे आहे.