बोराडी येथे कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांना अभिवादन

0

बोराडी। थोर स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणमहर्षी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांना आदरांजली कार्यक्रम बोराडी येथील विश्वासराव रंधे मैदानावरील स्मृतीस्थळावर संपन्न झाला. यावेळी समाधीस्थळावर फुला-हारांची सजावट करण्यात आली होती. उपस्थितांनी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी अतिथींनी रणधीर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

स्मृतींना दिला उजाळा ; पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती
यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे , सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे,विश्वस्त लिलाताई रंधे ,भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, माधवराव गुजर, विश्वस्त आर.एफ पाडवी, आनंदसिंग राऊळ ,राजेंद्र अग्रवाल, शिरपूर नगरपालिका नगरसेवक रोहीत रंधे , जिल्हा परिषद सदस्या सिमाताई रंधे, डॉ .सुमिताताई गवळी , विश्वस्त डॉ. जितेंद्र चित्ते, संस्थेचे सदस्य शामकांत पाटील, शिवाजीराव पाटील, नत्थु नामदेव बडगुजर, सारीका रंधे, ग्रामपंचायत सदस्या विद्याताई रंधे, हर्षाली रंधे, संजय गुजर, कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर, पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक रंधे, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन विजय देवरे, रतन पाटील ,प्रमोद पवार, ज्ञानेश्वर बडगुजर, रवींद्र शिंदे, किशोर भदाणे, भागवत पवार, राज निकम, दिपक रंधे संस्थेचे व्यवस्थापक ए.ए.पाटील,के. डी बच्छाव,भैय्या माळी, सिताराम माळी, परिसरातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, गावातील नागरिक, किसान विद्या प्रसारक संस्थेच्या सर्व शाखांचे शाखाप्रमुख , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदरांजली साठी उपस्थित होते.