शिरपूर । शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित एच.आर.पटेल फार्मसी महाविद्यालय व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बोराडी येथे क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या मार्गदर्शनाने व क्षयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा शिरपूरचे उपनगराध्यक्ष वशिरपूर एज्यु. सोसा. कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी बोराडी येथील रणजित पवार, मगन नारायण महाजन,बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील,शिसाका संचालक जयवंत पाडवी (उमर्दा), नगरसेवक देवेंद्र राजपूत, आरोग्य अधिकारी डॉ. ए. एच. लोहीया, धनराज पवार, प्राचार्य डॉ. एस. बी. बारी आदी उपस्थित होते.
पथनाट्याद्वारे क्षयरोगाची दिली माहिती
यावेळी विद्यार्थ्यांनी क्षयरोगाबद्दल ग्रामीण जनतेत जनजागृती निर्माण करावी असे आवाहन भुपेशभाई पटेल यांनी केले. प्रास्ताविक प्रा.राकेश मुथा यांनी केले. डॉ. ए. एच. लोहीया यांनी क्षयरोगाची शास्त्रोक्त माहिती दिली. क्षयरोगाबद्दलची माहिती ग्रामस्थांना मुख्य चौकात एल.ई.डी.च्या सहाय्याने चित्रफीत दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून क्षयरोगाविषयी जनजागृती केली. सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक वाय. बी. ठाकूर यांनी केले.कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.राकेश मुथा यांनी आभार मानले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी निलेश महाजन,संदीप मालचे, बबलू बाफना, राजूसुर्यवंशी, शाम पावरा, हेमंत निकम, महेंद्र पाटील,नितेश पाटील, संदीपनिकम, हिम्मत पवार, विशाल पाटील, बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले. या जनजागृतीपर कार्यशाळे प्रसंगी बोराडी येथील नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.