यावल- तालुक्यातील बोरावल खुर्द गावातून चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीचह बैलजोडी लंपास केली. ऐन हंगामात शेतकर्याची बैलजोडी चोरीस गेल्याने शेतकर्यावर संकट कोसळले आहे. शेतकरी गुरूदास गंगाधर पाटील, (38, बोरावल खुर्द) यांच्या तक्रारीनुसार चोरट्यांनी 1 जुलै रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास 35 हजार रुपये किंमतीची बैलजोडी लांबवली. सर्वत्र शोध घेवूनही बैलजोडी न आढळल्याने बुधवारी यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार नागपाल विश्वनाथ भास्कर करीत आहेत.