बोरावल शिवारातून ठिबक नळ्यांसह पाईप लांबवले

0

यावल : तालुक्यातील बोरावल शिवारातातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 62 हजार 500 रुपये किंमतीच्या ठिबक सिंचन नळ्या व शेती साहीत्य चोरीस नेल्याप्रकरणी यावल पोलि ात गुन्हा दाखल करण्यात आला. बोरावल खुर्द ता.यावल येथील राहणारे दिनेश अमोल पाटील व माधुरी दिनेश पाटील या शेतकर्‍यांच्या बोरावल खुर्द शिवारातील मालकीच्या शेत गट क्रमांक 9 मधील .95 आर क्षेत्रफळात लावण्यात आलेल्या नेटाफिम कंपनीच्या ठिबक सिंचनच्या दोन क्विटंल 45 किलो वजनाच्या सुमारे 60 हजार रुपये किंमतीच्या नळ्या व 2 हजार 500 रुपये किंमतीचे पीव्हीसी कंपनीचे एक नग पाईप अज्ञात चोरट्यांनी 17 ते 18 मे दरम्यान लांबवला. यावल पोलिसात दिनेश पराशर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फौजदार अजीज शेख हे करीत आहेत.