बोर्ली । बोर्ली पंचतन ग्रुप ग्रामपंचायतिच्या वतीने 14 व्या वित्त आयोगातून आमचा गाव व आमचा विकास कार्यक्रमांतर्गत 20 लाभार्थींना संगणक साहित्य, शेगडी, गॅस सिलेंडर वाटप तर ग्रामपंचायतीच्या 3 टक्के अपंग कल्याण निधीतून अपंगांसाठी धनादेश व साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.ग्रामपंचायतीच्या वार्षिक एकूण उत्पन्नातील 15 टक्के रक्कम ग्रामपंचायत हद्दीतील मागासवर्गीय घटकांच्या उन्नतीसाठी वापरणे व ग्रापमंचातीचा 3% अपंग कल्याण निधीतुन अपंगाना त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक साहित्य व धनादेश वाटप करणे व 14 व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमातून साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
आमचा गाव आमचा विकास कार्यक्रनंतर्गत साहित्य वाटपामध्ये 8 अंगणवाड्याना गणवेश व गॅस शेगडी सिलेंडर, मोहनलाल सोनी विद्यालयास पुस्तके व प्रिंटर, 3 प्राथमिक शाळांना साउंड सिस्टीम, इन्व्हर्टर, प्रिंटर तसेच अमृता चांदोरकर, मंदार खैरे, प्रणाली मोरे यांना संगणक त्याचप्रमाणे 15 टक्के अनुदानातून रोहिदास समाजास पार्टेक्स लादी बॉक्स तसेच बौद्ध , बुरुड व गवळी समाजास खुर्च्या वाटप करण्यात आले तर 3% अपंग कल्याण निधीतून 28 अपंग लाभार्थ्यासाठी साहित्य व धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच गणेश पाटील म्हणाले की, बोर्लीपंचतन ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम पाहताना चौदाव्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमा अतर्गत चार वर्ष अपंग, मागासवर्गीय व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जात असताना लाभार्ती मागणी नुसार निधी अपुरा पडल्याने गरजू विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची वेळ येऊन गेली आहे.
विकास हाच आमचा ध्यास
कोणत्याही पक्षाच्या नावाखाली कामे न करता गावाचा विकास साधला जाईल. गावाचा विकास हाच आमचा ध्यास असे उदगार या कार्यक्रमप्रसंगी सरपंच गणेश पाटील यांनी काढले. बोर्ली गावात सुलभ शौचालय बांधकाम 5 लाख चे काम सुरु आहे. पुढे ग्रामपंचायतची भव्य इमारत करण्याचा इच्छा व बोर्ली शहराच्या दोन्ही दिशेला सुरुवातीला स्वागत कमानी बांधण्याचा मानस असल्याचे सरपंच यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील अनेक समाजसेवकांचे सत्कार करण्यात आले.