जाडगाव फाट्याजवळ पहाटे अपघात : वाहनांचे प्रचंड नुकसान
भुसावळ- तालुक्यातील जाडगाव गावाजवळील फाट्यावर भरधाव कंटेनर पिकअप बोलेरोवर आदळून झालेल्या अपघातात पिकअपवरील चालक जागीच झाल्याची घटना बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. तुषार सुलताने (22, रा.जळगाव जामोद, बुलढाणा) असे मयताचे नाव आहे.
मत्स्य बीज आणताना झाला अपघात
जळगाव जामोद येथील नागरीक भुसावळ येथे मत्स्य बीज आणण्यासाठी पिकअप बोलेरो (एम.एच.28 बी.बी.0557) ने आले होते. बुधवारी पहाटे ते जळगाव जामोदकडे निघाले असताना समोरून भरधाव आलेला कंटेनर (एम.एच.04 एच.डी.6096) ने या वाहनाला धडक दिल्याने पिकअप चालक तुषार सुलताने जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत आलेले पाच जणही जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निलेश वाघ, मगर पठाण, अतुल कुमावत यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.