बोहरींच्या हत्येनंतर अमळनेर पुन्हा हादरले!

0

अमळनेर । बाबा बोहरी हत्येचे प्रकरण शमत नाही, तोवर अमळनेरला हादरा देणारी ही एकाच आठवड्यात दूसरी घटना घडल्याने अमळनेरकर सून्न झाले आहेत. अनिल खैरनार हा माजी सैनिक असून दुसाने (ता. साक्री) येथील मूळ रहिवासी आहे. तर सरिता खैरनार हिचे दहिवद ता अमळनेर येथील माहेर आहे त्याचे दूमजली घर असून दुसर्‍या मजल्याचे बांधकाम सूरू आहे काही दिवसांपूर्वी तो सैन्यदलातून सेवा निवृत्त झाला होता

धुळे येथे उपचारादरम्या मृत्यू
सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर पोलिस दलात त्याची निवड झाली होती. त्याचे पश्‍चात आई वडील बहिण भाऊ एक मूलगा असा परिवार आहे. या घटनेचे नेमके कारण गुलदस्त्यात असून, पोलिसांचा तपास सुरू आहे. पती अनिल खैरनारचा मृत्यूची घटना मारवड पोलीसांचे हद्दीत घडली त्यांचे शवविच्छेदन अमळनेर ग्रामिण रुग्णालयात करण्यात आले. तर पत्नी व मूलीची जळीत घटना अमळनेर पोलीसांच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान चिमुरडी तनुजाचा उपचारादरम्यान मृत्यू धुळे येथे झाला. या प्रकरणी सरिता अनिल खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेवानिवृत्ती मधून मिळालेला सर्व पैसे त्यांच्या घराच्या बांधकामात लावल्यामुळे आर्थिक तणावात असतांना त्याने फिर्यादी सरिता व मुलगी तनुजा यांना झोपेतून उठवून अनिल खैरनार यांनी सरीताच्या गळ्यावर चाकूने वार केले व त्यानंतर पेट्रोलच्या सहाय्याने पेटवले यात घाबरलेली लहान तनुजा ही आईला बिलगली म्हणून ती पण यात गंभीर भाजली आहे.