बोहर्डात गावात दोन गट भिडले : परस्परविरोधी गुन्हे

रावेर : तालुक्यातील बोहर्डा येथे किरकोळ कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला स्परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.

किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी
बोहर्डा, ता.रावेर येथील रवींद्र सीताराम उईके व अतुल अरुण वानखेडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटाचे नातलग एकमेकाला भिडल्यानंतर लाठ्या-काठ्यांचा वापर करून मारहाण करण्यात आले. या प्रकरणी रवींद्र उईके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अतुल वानखेडे, अरुण वानखेडे, ललिता वानखेडे, सुवर्णा वानखेडे, ईश्वर तायडे यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसर्‍या गटातर्फे अतुल वानखेडे यांच्या फिर्यादीवरुन मयूर तायडे, दुर्गाबाई अढांगळे, राहुल अढांगळे, विशाल अढांगळे, रवींद्र उईके, गोकुळ नाईके यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अजुन सोनवणे करीत आहेत.