भुसावळ: तालुक्यातील बोहर्डी जिल्हा परीषद शाळेतील मुख्याध्यापकानेच विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. गुरुवारी राज्य महिला आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे यांनी बोहर्डी गाठून पीडीत बालिकांची भेट घेत माहिती जाणून घेतली. या विद्यार्थिनींना मनोधैर्य योजनेतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिली. प्रसंगी आमदार संजय सावकारे हेदेखील उपस्थित होते.