बोहर्डीत वीज चोरी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

यावल– मुक्ताईनगर तालुक्यातील बोहर्डी येथील रघुनाथ तुकाराम पाटील, सुभाष नामदेव पाटील, एकनाथ काशीराम पाटील यांनी वीज तारांवर आकोडे टाकून प्रत्येकी दोन हजार 636 रुपयांची वीज चोरी केल्याने यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वरणगाव ग्रामीण महावितरणचे सहा.अभियंता शीतल तायडे यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार नागपाल भास्कर करीत आहेत. वीज वितरण विभागाच्या सावदा, मुक्ताईनगर विभागातील गुन्हे नोंदविण्यासाठी शासनाने यावल पोलीस ठाणे दिल्याने या पद्धत्तीचे गुन्हे आता यावल पोलीस ठाण्यात दाखल होणार आहेत.