बोहर्डी अत्याचार: मुख्याध्यापकाला कोठडी

0

भुसावळ: तालुक्यातील बोहर्डी बु.॥ शाळेचे मुख्याध्यापक गणेश चुडामण कोलते यांनी शाळेतीलच विद्यार्थिनींशी अश्‍लील वर्तन व अत्याचार केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. आरोपीची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग करीत आहेत.