बोहर्डी पेट्रोल दरोडा प्रकरणी आरोपींचे बनवले रेखाचित्र

0

भुसावळ – भुसावळचे नगरसेवक रमेश नागराणी यांच्या भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर बोहर्डी गावाजवळ नागराणी पेट्रोलियम पंपावर भल्या पहाटे पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी अडीच लाखांची लूट केली होती. या प्रकरणी पंपावरील मॅनेजर यांनी सांगितलेल्या संशयीतांच्या वर्णनावरुन वरणगाव पोलिसांनी आरोपींची रेखाचित्र बनवले आहे. आरोपींना पकडण्याकामी हे रेखाचित्र महत्त्वाचा दुवा ठरणार आहे तर याच गुन्ह्याच्या तपासाकामी यावल पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींनाही ट्रान्सपर वॉरंटच्या आधार ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परप्रांतीय आरोपींचे बनवले रेखाचित्र
शुक्रवार, 24 रोजी पहाटे पावणेपाच ते पाच वाजेदरम्यान दुचाकीवरुन अज्ञात 25 ते 30 वयोगटातील तिघा तरुणांनी पंपावरील मॅनेजर प्रभाकर खंडारे (भुसावळ) यांच्या डोक्याला पिस्तुल व चाकू लावत कपाटातील दोन लाख 45 हजारांची रोकड, दहा हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही रेकॉर्ड करण्याचे डीव्हीआर व चार हजार रुपये किंमतीचा मोबाईल मिळून दोन लाख 59 हजारांचा मुद्देमाल लांबवला होता. पोलिसांनी खंडारे यांनी सांगितलेल्या वर्णनानंतर आरोपींचे स्केच (रेखाचित्र) बनवले आहे. या गुन्ह्याच्या चौकशीकामी यावल पोलिसांनी पकडलेल्या मुकेश बारेला, राकेश बारेला, सुनील बारेला (बडवानी, मध्यप्रदेश) या संशयीतांनादेखीत ट्रान्सपर रिमांडच्या आधारे ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी दिली.