नवापूर । पुर्वीचा काळात राजे रजवाडे आपल्या धार्मीक व शुभ व मंगल कार्यात सर्व प्रथम मंगलवाद्य वाजवणार्याना बोलवुन नंतरच कार्यक्रम करायचे.मंगल वाद्याचा मधुर सुरांनी वातावरण प्रसन्न वाटते.शहनाईची धुन.सांभारचा आवाज या मधुर मिलन धुनाने शुभ कार्याला रंगत येऊन वातावरण प्रसन्न होते,लग्न कार्यात गृहशांती,हळद व देवदेवता आगमन या कार्यक्रमाला मंगलवाद्य लागतेच त्या शिवाय कार्य पुर्ण होतच नाही.जुने जाणकार या वाद्या शिवाय कोणते ही कार्य करतच नव्हते.
उदरनिर्वाहासाठी मंदिरात सेवा
नवापूर शहरात शुभ मंगल वाद्य वाजवणारे गुरव परिवार 35 वर्षापुर्वी वास्तव्याला आले.शहरातील विविध मंदिराचा सांभाळ करत त्यांनी व्यवसायिक जोड म्हणुन मंगलवाद्य वाजवुन शुभ कार्याची शोभा ही ते वाढवत आले आहे. संजय गुरव म्हणाले की वडिलोपार्जीत आमचा हा व्यवसाय आहे.पुर्वी आजोबा एकनाथ गुरव हे मंगलवाद्य वाजवायचे त्यांचा निधन नंतर आम्ही ते काम करत आहोत. आमचा गुरव समाज धुळे जळगाव शिरपुर अशा अनेक भागात विखुरला आहे संजय गुरव म्हणाले की विखरण ता दोडाईचा येथील आम्ही रहिवाशी आहोत.मी नवापूरला लहानपणी असतांना आलो आजोबा जवळ राहुन मंगल वाद्य वाजवायला शिकलो व येथेच उदरनिर्वाह साठी 2001 पासुन स्थाईक झालो.18 वर्ष झाली आहेत.मी ब्रम्हचारी असुन लग्न कार्यात मंगलवाद्य वाजवुन उदर्निवाह करतोये या व्यतिरिक्त मंदिरात जाऊन तेथे सेवा देतो. मी समाधानी आहे.आनंदी आहे असे ही ते म्हणाले. आजच्या आधुनिक काळात पारंपारीक वाद्यपरंपरा इतिहासजमा होत असून बँण्ड व डीजेलाच जास्त महत्व आले आहे.
आगामी काळ खडतर भासतोय…
आधुनिक युगात मंगलवाद्याना आज ही तेवढेच महत्व आहे पण आजचा युगात लग्न कार्यात डि जे व बँण्डला जास्तीचे महत्व आल्याने आजची पिढी मंगलवाद्याला महत्व देत नसल्याचे खंत मंगलवाद्य वादक संजय गुरव यांनी व्यक्त केली. नवापूर शहरात संजय गोविंद गुरव (35) सांभार वाद्य,तुकाराम गुरव पिंगाणी वादक रा. जुनी महादेव गल्ली नवापूर हे मंगलवाद्य वाजविण्याचे काम करत आहे. संजय गुरव म्हणाले की लोकांकडुन मान सन्मान मिळतो पण पैसा योग्य तो मिळत नाही,डि जे व बँण्ड वाजेला 25 ते 50 हजार आनंदाने देतात पण शुभ कार्यासाठी लग्न समारंभात मंगलवाद्य वाजणार्याना हजार बाराशे रुपये देतांना ही काटकसर करतात, अशी खंत व्यक्त केली.