ब्रम्हपुत्रा नदीत बोट उलटली ; दोघांचा मृत्यू

0

गुवाहाटी : आसाममधील गुवाहाटी येथील ब्रम्हपुत्रा नदीमध्ये बोट उलटल्याने २ जणांचा मृत्यू झाला आहे . बोटमध्ये ४० जण प्रवास करत होते. त्यापैकी १२ लोकांना वाचवण्यात यश आले असून इतर लोकांचा शोध घेतला जात आहे. बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्तजण बसल्याने उलटली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गुवाहाटीच्या उत्तरेकडील भागाच्या ब्रम्हपुत्रा नदीमध्ये ही बोट होती. बोट उलटल्याची बातमी मिळताच बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने इतर लोकांचा शोध घेण्यात येत आहे. या बोटीमध्ये ४० प्रवासी, ७ मोटार गाड्या, २ सायकली आणि बोट चालवणारे असे ३ लोक होते. या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्तजण बसले होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.