फैजपूर । पुर्वी गुरुसाठी शिष्याची परिक्षा घेतली जायची. आपण कोण आहे यासाठी गुरु करायचा असतो. ‘अहम् ब्रह्मास्मी’ मी ब्रम्ह आहे पण त्याची अनुभुती घेण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. शरिरातून आत्मा गेल्यानंतर ते शरीर मृतदेह असते. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्या शरिराचे सगळे लाड पुरविण्यासाठी आपण तत्पर असतो. हा आत्मा म्हणजे कोण याचा शोध घेण्यासाठी गोपी श्रीकृष्णाची भक्ती करतात. गोपींनी आपल्या-आपल्या कृष्ण म्हणून समाजात त्यांची ओळख करुन देतात. ही ओळख प्रत्येकाला व्हावी म्हणून सत्संग ऐकण्याचे आवाहन आचार्य जनार्दन हरिजी महाराज यांनी केले. तराई दुर्गोत्सव मित्रमंडळ खिरोदा यांच्यातर्फे आयोजित गोपी गीत सत्संगाच्यावेळी निरुपण करतांना ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, आपल्यावर कितीही संकटे आली तरी आत्महत्या करण्याचा विचार करु नये. संकटांचा सामना करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. व्यसन, आत्महत्या टाळण्यासाठी कथा श्रवण अमृतासमान कार्य करते व मन स्थिर करते, असेही त्यांनी सांगितले.