फैजपूर- सतपंथ मंदिर संस्थानचे 11 वे ब्रम्हलीन गदीपती संत श्री जगन्नाथ महाराजांचा 17 वा पुण्यतिथी महोत्सव 13 व 14 डिसेंबर रोजी समाधीस्थळी येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी जगतगुरु सतपंथाचार्य नानकदास महाराज, धर्मप्रसाद महाराज (वडताल), शास्त्री भक्तिप्रकाशदासजी, गोपाल चैतन्य महाराज (पाल), मानेकर बाबा शास्त्री (सावदा), महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, योगेश्वर उपासनी महाराज (अमळनेर), भरत महाराज (कुसुंबा), स्वरूपानंद महाराज (डोंगरदे), शकुंतला दीदी, अंकुश महाराज (आळंदी), सतपंथ मुखी परीवार महाराष्ट्र (गुजरात), मध्यप्रदेश पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती लाभणार आहे. 13 रोजी सायंकाळी पाच ते दरम्यान ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज यांची पुण्यतिथी महापूजा, 14 रोजी सकाळी 7.30 ला भव्य शोभायात्रा, सकाळी 9.30 ते 10 समाधी पूजन, सकाळी 10 ते 12 संतांचे अमृतवचन व सतपंथ दिनदर्शिका 2019 चे प्रकाशन होईल. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन सतपंथ मंदिराचे गादिपती तथा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले आहे. दरम्यान, सतत 16 वर्षांपासून गुरूंचा हा सोहळा अविरतपणे सुरू असून परीसरातील सर्व संत-महात्मा भाविक येतात, सांप्रदायिक समरसतेचा संदेश या माध्यमातून दिला जात असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज म्हणाले.