ब्राम्हणशेवगेच्या विकासासाठी खासदारांकडे साकडे

0

चाळीसगाव । तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील शिष्टमंडळाने पारोळा येथे जाऊन खासदार ए.टी.नाना पाटील यांची गाव विकास कामांबाबत नुकतीच भेट घेतली व येथील प्रलंबित सभामंडपाबाबत साकडे घातले. सन 2014-2015 या वर्षी सदर सभामंडप मंजुरीचे खासदार निधीचे पत्र असतांना अद्याप हे काम मार्गी लागत नसल्यामुळे नाराज ग्रामस्थाच्या मागणीनंतर शिष्ठमंडळ भेटले. यावेळी लगेच तिसर्‍यांदा पत्र देण्यात येऊन जिल्हाधिकारी तथा सचिव, जिल्हा नियोजन समिती जळगाव मंजुरीचे आदेश दिले आहेत. याप्रसंगी चाळीसगाव भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, महादू पागे, ग्रा.सदस्य व माजी उपसरपंच शांताराम(बाबासाहेब) नेरकर, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर बाविस्कर, सोमनाथ माळी उपस्थित होते.