ब्राम्हणशेवगे येथे विवाह प्रसंगी झाडांची रोपे वाटप

0

चाळीसगाव  । तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रा.पं.सदस्य शांताराम नरहर नेरकर यांचे मुलगा चि.राहुल नेरकर आणि चि.सौ.का.माधुरी पाटील यांचा विवाह सोहळा सोमवारी 22 मे 2017 रोजी तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न पार पडला. वधु वरांनी सामाजिक भान ठेऊन झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देत चिंच, लिंब, सिताफळ या झाडांची रोपे लग्न समारंभासाठी आलेल्या मंडळींना मोफत वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांनी कौतूक केले. जुन्या रुढी ,परंपरांना फाटा देत असे सामाजिक उपक्रम लग्न समारंभातुन पुढे येण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी, प्रगतीशिल शेतकरी रत्नाकर बाविस्कर, जालिंदर बाविस्कर, ज्ञानेश्वर राठोड, नाना पाटील, राजेंद्र माळी यांनी म्हटले आहे.