ब्राव्होच्या धडाकेबाज खेळीने चेन्नईचा मुंबईवर विजय

0

मुंबई : आयपीएलचा पहिल्याच सामन्यात चेन्नईचा अखेरच्या षटकापर्यंत सामना रंगला. चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईने चेन्नईपुढे 166 धावांचे लक्ष्य  ठेवले होते. लक्ष्यचा पाठलाग करीत चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे विजय मिळविणे शक्य झाले. बिनीचे फलंदाज बाद झाल्यावरही विजयाचा शिल्पकार ठरलेल्या ब्राव्होने 30 चेंडूंमध्ये 68 रनांची फलंदाजी करीत चेन्नईने एक विकेट राखून विजय मिळवत आपले गुणांचे खाते उघडले.

सुरुवातीला चेन्नईने शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मोठी खेळी साकारण्यात ते दोघेही अपयशी ठरले. या दोघांना हार्दिक पांड्याने बाद केले. त्यानंतर सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच बाद झाले. त्यामुळे चेन्नईचा डाव संकटात सापडला होता. रवींद्र जडेजाला 12 धावांवर बाद केले. पंधराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मिस्ताफिझूर रेहमानने बाद केले.

मुंबईच्या गोलंदाजीवर प्रहार करीत ड्वेन ब्राव्होने संघाची बाजू सांभाळली होती. ब्राव्हो आता चेन्नईला सामना जिंकवून देणार असे वाटत होते, पण 19 व्या षटकात त्याला जसप्रीत बुमराने बाद केले. त्यानंतर जखमी झालेला केदार जाधव फलंदाजीला आला व त्याने अखेरच्या षटकातील पहिले तीन चेंडू निर्धाव गेले नंतरच्या चौथ्या चेंडूवर केदार जाधवने षटकार लगावला चेन्नईच्या संघाने विजयाचा जल्लोष केला.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने १८ चेंडूंमध्ये १५ रन करीत बाद झाला.शेन वॉटसनने 15 धावांवर असताना रोहितला बाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव (43), इशान किशन (40) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी रचली. हे दोघेही बाद झाल्यावर हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूंनी जोरदार फटकेबाजी केली. हार्दिकपेक्षा कृणाल अधिक आक्रमक फलंदाजी करत होता. कृणालने चेन्नईच्या गोलंदाजीची पिसे काढली आणि 22 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 41 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. हार्दिकने 20 चेंडूंत 2 चौकारांसह नाबाद 22 धावा केल्या.