चाळीसगाव। ज लयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र शासनाचा प्राध्यांनाने राबवित येत असलेला उपक्रम आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करुन जलयुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी शासनातर्फे करोडो रुपये खर्च करण्यात येत आहे. राज्यभरात जलयुक्तचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे गावाचा सन 2016-17 मध्ये पाणलोट विकास योजनेतून जलयुक्त शिवार अभियान योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. मात्र जलयुक्त अंतर्गत करण्यात येणारे कोणतेही काम या ठिकाणी झालेले नाही. शासनाकडून जलयुक्तसाठी लाखो रुपये मंजुर आहे मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे जलयुक्तचे शुन्य काम असल्याचे दिसून येत आहे.
34 लाखाचे प्रस्ताव
जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणी प्रश्नावर मात करता येणार आहे. जलयुक्तची अंमलबजावणीसाठी शासना विशेष प्रयत्न केले जात आहे. जिल्हा प्रशासनाला जलयुक्तच्या कामासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. 11 सिमेंट नाला बांधामधील गाळ काढणे व 1 सिमेंट बांध बांधणे या कामांचा कृती आराखडा तयार असून जवळपास 34 लाख रुपयाचा प्रस्ताव जलयुक्तच्या कामांसाठी मंजुर आहे.
टेंडर्ससाठी चढाओढ
जलयुक्त शिवार अभियान हे शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. शासनाने प्रशासनाला जलयुक्तच्या कामे मुदतीत पुर्ण करण्याचे वेळ दिले आहे. चाळीसगाव कृषी विभागाने ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवार फेरी काढून कामाचा गाजावाजा केला. मात्र अद्यापही कामकाज सुरु झालेले नसल्याने प्रशासनाचे उदासिनता समोर आले आहे. प्रशासनातील विभागामध्ये ताळमेळ नसल्यामुळे व ई-टेंडर मध्ये काम मिळण्यासाठी चढाओढ सुरु आहे.
पाणी वाया जाणार
पावसाळ्यातील पाणी जास्तीत जास्त अडविण्यासाठी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून काम केले जात आहे. पावसाळ्याला सुरुवात झाले असून अद्यापही जलयुक्तचे कामे झाले नसल्याने पावसाळ्यातील पाणी वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पावसाळ्यातील पाणी अडवल्यास त्याचा फायदा सिंचनासाठी होणार आहे. सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे. पावसाळ्याचे पाणी वाहुन जाऊ नये यासाठी दादाभाऊ बाविस्कर या युवा शेतकर्याने शेतालगतच्या सिमेंट बांधातील गाळ स्वःखर्चाने काढले आहे.