चाळीसगाव। तालुक्यातील ब्राह्मणशेवगे परिसरात बीएसएनएलच्या टॉवर साठी केबल टाकण्याचे काम सुरु आहे. टॉवरच्या कामासाठी कंत्राटदारांनी डेरेदार वृक्षांची कत्तल सुरु केली असून यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. कंत्राटदारांची चौकशी होऊन संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्च्याच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना शुक्रवारी 26 रोजी देण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथुन केबल टाकण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे वृक्षांची मोठ्या प्रमांणात कत्तल होत आहे. शेती मशागतीचे काम अंतिम टप्यात असतांना कंत्राटदार शेतकर्यांना अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने कारभार करत आहे. यावेळी सोमनाथ माळी, प्रा.गौतम निकम, ओंकार जाधव आदी उपस्थित होते.