चाळीसगाव। येथील बससेवाच्या विरोधता बातम्या मागील आठवड्यात प्रकाशित झाल्यानंतर सोमवार 17 जुलै 2017 रोजी आगार प्रमुख यांना लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी तसेच ब्राम्हणशेवगे येथील ग्रा.पं.पदाधिकारी शांताराम नेरकर, रत्नाकर बाविस्कर, ज्ञानेश्वर राठोड, पोलिस पाटील, राजेंद्र माळी, अनिल नेरकर, संजय बाविस्कर, प्रविण माळी इ.यांचे शिष्टमंडळाने भेट देऊन प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थींच्या समस्यांबाबत चर्चा केली.
आगार प्रमुख यांनी याबाबत त्वरीत दखल घेत मानव विकासची गाडी मंगळवार 18 जुलै 2017 पासुन सुरु करून इतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.