लंडन । कारकिर्दीतल्या शेवटच्या 100 मीटर शर्यतीतील पराभवानंतरही स्प्रीटंचा बादशहा समजला जाणारा युसैन बोल्ट म्हणाला की, तो अजूनही इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. बोल्टच्या मैदानावरील कारकिर्दीचा शेवटही महान खेळाडू सर डॉन ब्रॅडमन आणि मोहम्मद अली यांच्यासारखा झाला. डॉन ब्रॅडमन शेवटच्या सामन्यात शून्यावर बाद झाले होते तर मोहम्मद अली यांना शेवटच्या सामन्यात एका नवख्या बॉक्सरकडून पराभूत झाले होते. 100 मीटरच्या शेवटच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून बोल्ट निरोप घेईल असा त्याच्या चाहत्यांचा अंदाज होता. पण बोल्टला आपल्या चाहत्यांची अपेक्शा पूर्ण करता आली नाही. या शर्यतीत त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
ब्रॅडमन यांना शेवटच्या इनिंगमध्ये चार धावा करायच्या होत्या. या चार धावांमुळे त्यांची फलंदाजीतील सरासरी 100 झाली असती. पण दुदैवाने ते शून्यावर बाद झाले. त्याचप्रमाणे मोहम्मद अली यांना शेवटच्या लढतीत फारसा नावाजलेला नसलेला बॉक्सर ट्रॅवर बार्बिककडून पराभव पत्कारायला लागला होता. या दोन घटनांमुळे त्यावेळी त्यांचे चाहते खूप निराश झाले होते. पण या अपयशाुंळे दोन्ही खेळाडूंची महनता कमी झाली नाही. त्याचप्रमाणे बोल्टचे महत्वही या पराभवामुळे कमी होणार नाही.
बोल्टनी मागितली माफी
या दोन घटनांमुळे त्यावेळी त्यांचे चाहते खूप निराश झाले होते. पण या अपयशाुंळे दोन्ही खेळाडूंची महनता कमी झाली नाही. त्याचप्रमाणे बोल्टचे महत्वही या पराभवामुळे कमी होणार नाही. शेवटच्या शर्यतीत पराभूत झाल्यावर बोल्टने स्नॅपचॅटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांची माफी मागीतली आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार मानले. त्यानंतर बोल्ट आपली मैत्रिण कासी बेनेटसह लंडनमधील प्रसिद्ध अशा नाईटक्लबमध्ये गेला आणि पहाटे 5 वाजेपर्यंत त्याने दणक्यात पार्टी केली.