बाजारपेठ डीबी शाखेची कामगिरी ; सहा महिन्यांपूर्वीच्या चोरीचा उलगडा
भुसावळ : शहरातील पुरूषोत्तम नगरातील जुन्या घराचे बांधकाम पाडले असतानाच चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीचे ब्रेकर व कटींंग मशीन लांबवले होते. बाजारपेठ पोलिसात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बाजारपेठच्या डीबी पोलिसांनी दोघा चोरट्यांच्या रविवारी मुसक्या आवळत साहित्य जप्त केले. चैम्पियन शाम इंगळे (19) व रीयाजुदिन शेख चिरागोदीन (33, दोन्ही रा. भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे, नाईक सुनील थोरात, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, विशाल सपकाळे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.