ब्रेक फेल झाल्याने अंजाळे घाटात मिनीडोअर उलटून 12 प्रवासी जखमी

0

यावल : भुसावळ-यावल मार्गावरील अंजाळे घाटात ब्रेक नादुरुस्त झाल्याने प्रवाशांनी भरलेली मिनिडोअर दरीत कोसळली मात्र नशीब बलवत्तर असल्याने रीक्षातील 12 प्रवाशांनासह चालकास केवळ किरकोळ जखमा झाल्या. शनिवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

यावल शहरातून भुसावळला जाण्यासाठी शहरातील भुसावळ टी पॉइन्टवरुन मिनिडोअर (क्र. एम.एच.19 जे 5115) प्रवासी घेऊन भुसावळकडे निघाली. अंजाळे गावाच्या बसस्थानकाजवळील घाटात उतारावरच रीक्षाचे ब्रेक फेल झाल्याने वाहन दरीत कोसळले. सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झाले नाही. सर्व प्रवासी व चालकाला किरकोळ दुखापत झाली. या अपघातामुळे घाटातील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली तर रात्री उशिरापर्यंत यावल पोलिसात या प्रकरणी नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.