‘ब्लू व्हेल’ या आत्मघातकी गेमविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0

नवापूर । श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथील वरिष्ठ शिक्षक जे. ए. पाठक यांनी ब्लू व्हेल गेमविषयी मार्गदर्शन केले. पाठक म्हणाले की, रशियाच्या अवघ्या बावीसवर्षीय फिलिप बुडाकीन यांनी तयार केलेल्या या आत्मघातकी गेम असून रशियापासुन सुरु झालेला हा जीवघेणा खेळ हळू हळू आपल्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. मुंबईतील चौदा वर्षीय मनप्रीतचे उदाहरण देत हा खेळ खेळणार्‍या मुलांची मानसिक स्थिती हळू हळू नैराशेकडे नेत घरच्यांशी, मित्रांशी नाते संपवायला लावून हॉरर चित्रपट पाहणे, हाताला-गालाला पिना टोचून इजा करून घेण्यास भाग पाडणे व शेवटी संपूर्ण संमोहित करून आत्महत्या करण्यास भाग पाडणे. अशा विविध स्टेप्सने प्रवास करणार्‍या आत्मघातकी खेळापासून शालेय मुलांनी लांब राहणे आवश्यक आहे असे आवाहन केले. विविध ऍप्स व गेम डाउनलोड करतांना कशी फसगत केली जाते हे प्रात्येक्षिकासह त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पर्यवेक्षक एम.जे. सोनवणे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शंकांचे केले निरसन
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी ब्ल्यू व्हेल गेमविषयीची उत्सुकता जाणून घेत विविध प्रश्न उपस्थित करत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. सोशियल मिडियावर चर्चेत असणार्‍या गेमविषयी सखोल माहिती मिळाल्यामुळे मुलांनी समाधान व्यक्त केले. या मुलांच्या विवेक जागृतीपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम.एस. वाघ यांनी, सूत्रसंचालन नारायण मराठे यांनी तर आभार डॉ. योगिता पाटिल यांनी मानले. यशस्वीतेसाठी समाधान खैरनार, गणेश महाजन व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली.