मुंबई:- ‘ब्ल्यू व्हेल’ हा ऑनलाइन गेम जीवघेणा ठरत आहे. अंधेरीतील १४ वर्षीय मुलाने या गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे या गेमवर राज्यात बंदी आणावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
या गेममुळे झालेली ही भारतातील पहिली आत्महत्या आहे. ‘ब्ल्यू व्हेल’च्या आहारी जाऊन जगभरात १५० हून अधिक मुलांनी आत्महत्या केली असल्याची माहिती देत अजित पवार यांनी या गेमवर बंदी आणा अशी मागणी केली. यावर हा गेम जीवघेना असून याबाबत केंद्राशी चर्चा करून बंदीबाबत निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितले.