भंडारा-भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी झाली. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात या ठिकाणी अटीतटीची लढत झाली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार मधुकर कुकडे विजयी झाले आहे. जवळपास ४० हजार मतांनी त्यांनी विजय संपादन केले आहे. त्यांनी भाजपाचे हेमंत पटले यांना पराभूत केले आहे.