पिंपरी चिंचवड । निगडीत भक्ती शक्ती चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम करण्यासाठी चौकातून जाणारी वाहतूक वळविली आहे. वाहतुकीतील हा बदल पुढील काही दिवस काम पूर्ण होईपर्यंत असणार आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिला आहे. निगडी भक्ती शक्ती चौकात उड्डाणपुल कामासाठी वाहतूकीत बदल केला आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणार्या वाहनांना भक्ती शक्ती चौकातून डाव्या बाजूला वळून अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्ट नगरमधून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाता येणार आहे. तसेच पुण्याकडून त्रिवेणीनगरकडे जाणार्या वाहनांना भक्ती शक्ती चौकातून डाव्या बाजूला वळून अप्पूघर मार्गे ट्रान्सपोर्टनगर मधून निगडी नाक्यावरून यु टर्न घेऊन पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून त्रिवेणीनगरकडे जाता येणार आहे.
असा असेल बदलीचा मार्ग…
तसेच मुंबईकडून पुण्याकडे जाणार्या वाहनांना पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून चिकन चौकातून उजवीकडे वळून दुर्गा चौकाकडे जाता येणार आहे. तसेच दुर्गा चौकातून उजवीकडे टिळक चौकाकडे अथवा दुर्गा चौकातून सरळ टेल्को रोडने थरमॅक्स चौकातून खंडोबामाळ येथून मुंबई पुणे महामार्गाकडे जाता येणार आहे. मुंबईकडून प्राधिकरण भेळ चौक, चिंचवडकडे जाणार्या वाहनांना पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून चिकन चौक, दुर्गा चौक, टिळक चौक मार्गे भेळ चौक, चिंचवडकडे जाता येणार आहे. संभाजी चौकातून मुंबईकडे जाणा-या वाहनांना अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगर मधून मुंबई पुणे रस्त्यावर जाता येणार आहे. संभाजी चौकातून त्रिवेणीनगरकडे जाणार्या वाहनांना अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगर मधून निगडी नाका येथून यु टर्न घेऊन पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून त्रिवेणीनगरकडे जाता येणार आहे. अथवा संभाजी चौकातून भेळ चौक, टिळक चौक मार्गे त्रिवेणीनगरकडे जाता येणार आहे. त्रिवेणीनगरकडून पुण्याकडे जाणार्या वाहनांना टिळक चौकमार्गे अथवा थरमॅक्स चौक, खंडोबा माळ चौकमार्गे पुण्याकडे जाता येणार आहे. त्रिवेणीनगरकडून संभाजी चौक बिजलीनगरकडे जाणा-या वाहनांना दुर्गा चौक, टिळक चौक मार्गे भेळ चौकातून बिजलीनगरकडे जाता येणार आहे. त्रिवेणीनगरकडून मुंबईकडे जाणार्या वाहनांना टिळक चौक,भक्ती शक्ती चौकातून डावीकडे वळून अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्ट नगर मधून मुख्य रस्त्यावरून मुंबईकडे जाता येणार आहे. तसेच किंवा टिळक चौकातून भेळ चौक मार्गे, रावेत मार्गे मुंबईकडे जाता येणार आहे.