भडगाव येथील विद्यार्थींनीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

0

भडगाव – येथिल आदर्श कन्या महाविद्यालयातील 12 वी शास्त्र शाखेची विद्यार्थिनी निशा दिलीप पाटील (रा.यशवंतनगर भडगाव) या विद्यार्थिनीस राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्यामुळे तिचा सत्कार करताना भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अमोल पाटील, अ‍ॅड. निलेश तिवारी, भाजपा शहरध्यक्ष शैलेश पाटील, अनिल महाजन,सचिन पाटील, समाधान कोळी, शुभम सुराणा, विद्यालयाचे मुख्यध्यापिका लतिका वाघ, शिक्षक वृंद उपस्थितीत होते.

14 जानेवारी 2016 रोजी सकाळी 9 वाजता कौशल्या प्रकाश देशमुख यांच्या घराला इलेक्ट्रिक शाँट शर्कीटमुळे आग लागली होती. घरातील झोक्यात 7 महीन्याची मुलगी होती. घरात कोणीही जाण्यास धजावत नव्हते परंतु कु. निशा हिने कुठलाही विचार न करता सरळ घरात प्रवेश करुन 7 महीन्याची तान्हुलीला निशाने सुखरुप बाहेर काढले होते. त्याची या शौर्याची दखल घेवुन तिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. निशा हिच्या घराची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. आई वडील मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करीत आहे.