‘भयमुक्त रेल्वे स्थानक’ मोहिमेद्वारे जनजागृती

0

पिंपरी-आकुर्डी प्राधिकरण रेल्वे स्थानक परिसरात दिवसेंदिवस प्रवाश्यांची संख्या वाढत आहे. वाढत्या लेकासंख्येमुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होत आहे. रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे पोलिसांची चौकी नसल्यामुळे गुन्हेगार दिवसाढवळ्या लुट करू लागले. त्यामुळे परिसरातील प्रवाशी नागरिक भयग्रस्त आणि असुरक्षित झाले.यावर तातडीचा तोडगा आवश्यक असल्यामुळे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवकांनी आरपीएफ,रेल्वे पोलीस व स्टेशन कर्मचारी अधिकारी यांचे सोबत “भयमुक्त रेल्वे स्थानक” ही मोहीम राबवली.

सदरची मोहीम सलग दोन महिने राबविण्यात आली व अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यामुळे गुन्हेगारीच्या आलेख्यात मोठ्या प्रमाणात घट झाली.अशी अतुलनीय कामगिरी समितीच्या स्वयंसेवकांनी केल्यामुळे तसेच पिंपरी चिंचवड शहर परिसरात रात्र गस्त उपक्रम नागरिकांच्या सुरक्षा हितासाठी राबविला याकरिता ४० स्वयंसेवकांचा सन्मान महापौर,उपमहापौर तसेच अनुप मोरे सोशल फौंडेशन यांच्या वतीने महापालिका भवन येथे महापौरांच्या दालनामध्ये करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती महापौर नितीन काळजे,उपमहापौर शैलजा मोरे,विरोधी पक्षनेते दत्ता साने, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सदस्य नगरसेवक राजू मिसाळ, राजेंद्र गावडे,समिती अध्यक्ष विजय पाटील यांची होती.

निगडी, यमुनानगर, सिंधुनगर, आकुर्डी, गंगानगर, वाल्हेकरवाडी, रावेत, बिजलीनगर, प्राधिकरण, गुरुद्वारा परिसर या १० उपनगरातील नोकरदार आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने लोकल रेल्वे चा वापर दळणवळण साधन म्हणून करीत आहे. त्यामुळे आकुर्डी रेल्वे स्थानकामधून प्रवास करणारयांची संख्या आता 20 हजारच्या जवळपास पोहचली आहे. सदरच्या १० उपनगरातील प्रवाशी वर्ग सधन असल्यामुळे गुन्हेगारांच्या नजरा आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरावर केंद्रित झाल्या आणि त्यामुळे गेल्या वर्षभरापासून लुटण्याचा तसेच पाकिटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

अर्चना घाळी,विजय मुनोत,अड विद्या शिंदे,विभावरी इंगळे,गौरी सरोदे, रेखा भोळे,सुरेखा सोनवणे,बाबासाहेब घाळी,संतोष चव्हाण,मनोज ढाके,अमृत महाजनी,अमित डांगे,जयेंद्र मकवाना,जयप्रकाश शिंदे, सतीश देशमुख,लक्ष्मण इंगवले,विशाल शेवाळे,राम सुर्वे,मंगेश घाग,संदीप सकपाळ,राजकुमार कांबीकर,नाना कुंबरे,उमेश कांगुडे,प्रदीप पिलाने,बळीराम शेवते,शिवाजी अडसूळ,विजय जगताप, नितीन मांडवे,अजय घाडी,तेजस सापरिया,अश्विन काळे, समीर चिले, सतीश मांडवे,राजेश बाबर, बापू गोरे,स्वप्नील चव्हाणके,भरत उपाध्ये, उद्धव कुंभार यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला गेला. या प्रसंगी महापौर नितीन काळजे म्हणाले,” शहराच्या सुरक्षेकरिता स्वयंसेवक दक्ष राहुन मोलाचे कार्य करीत आहेत.  महापालिकेच्या दृष्टीने सदरची बाब नक्कीच अभिमानास्पद आहे.”

उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या,”अशी धाडसी मोहीम प्राधिकरण समितीने राबविणे नक्कीच उल्लेखनीय आहे. सुरक्षेकरिता पालिका यापुढे समितीला मदत नक्कीच देईल. प्रास्ताविक उपमहापौर मोरे यांनी केले.आभार समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी मानले.