भय्युजी महाराज इतक्या टोकाचे पाऊल उचलतील कधीही वाटले नव्हते

0

मुंबई : भय्युजी महाराज यांनी आज गोळी झाडून आत्महत्या केली. भय्युजी महाराज गेल्या काही दिवसांमध्ये थकले होते, मात्र, ते इतक्या टोकाचे पाऊल उचलतील, असे कधीही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते माधव भंडारी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे. त्यांचा महाराष्ट्रातील दिग्गज नेते त्यांना राजकीय सल्ला घेत होते. त्यांच्या या निधनामुळे सगळे राजकीय वर्तुळच हादरले असून अचानक निघून जाण्याने त्यांच्या समर्थक व भक्तांनाही मोठा धक्का बसला आहे.

भंडारी यांनी सांगितले की, भय्युजी महाराज आणि माझी भेट गेल्या महिनाभरापूर्वीच झाली होती. त्यांचा आणि माझा अनेक वर्षांचा स्नेहसंबंध होता. परंतु त्यावेळेस ते थकल्यासारखे वाटत होते. मात्र, ते इतक्या टोकाचे पाऊल उचलतील, असे कधीही वाटले नव्हते. त्यांनी मला इंदूरला येण्याचे आमंत्रणही दिले होते, असे भंडारी यांनी सांगितले.