वडिलांची मुलासह पत्नीला मारहाण

0

पिंपरी : मुलाला मोबाईलमधील नाव वाचता न आल्याने वडिलांनी त्याला हाताने मारहाण केली. मुलाला मारु नका असे सांगणार्‍या पत्नीला देखील अश्‍लील शिवीगाळ करत तिच्या डोक्यात हिटरचा रॉड घातला. ही घटना गुरूवारी संत तुकारामनगर येथे घडली.

याप्रकरणी शितल विलास जाधव (वय 30, रा. संत तुकारामनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास रंगनाथ जाधव (वय 38) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी पती-पत्नी आहेत. आरोपीने मुलास मोबाईलमधील नाव वाचण्यास सांगितले. मुलाला नाव वाचण्यास न आल्याने आरोपीने त्याला हाताने मारहाण केली. मारहाण करू नका, असे सांगणार्‍या पत्नीला अश्‍लील शिवीगाळ करत हिटरचा रॉड तिच्या डोक्यात मारला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.