भरधाव अ‍ॅपेची दुचाकीला धडक : साकळीच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

यावल : तालुक्यातील साकळी – मनवेल रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणार्‍या अ‍ॅपेने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी रीक्षा चालकाविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातानंतर अ‍ॅपे रीक्षा चालक पसार
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ताथु भास्कर भील यांनी फिर्याद दिली. त्यांचे वडील भास्कर उखा भील (62, रा.भिलवाडा, साकळी) हे आपल्या दुचाकीने मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दगडी-मनवेल येथून कामावरून साकळी येथे येत असताना साकळी-मनवेल रस्त्यावर पाटचारीच्या जवळ समोरून अ‍ॅपेरीक्षा (एम.एच.19 ए.जे.0194) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात भास्कर भील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अ‍ॅपे रीक्षा चालक रीक्षा सोडून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच भास्कर भील यांच्या कुटुंबीयानी घटनास्थळी धाव घेतली. मयत भास्कर भील यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. अपघात प्रकरणी यावल पोलिसात रीक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातग्रस्तत अ‍ॅपे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.