भरधाव आयशर दुचाकीवर धडकले : तरुण गंभीर जखमी

Bike rider injured after collision with Eicher in Rawer रावेर : भरधाव आयशरने दिलेल्या धडकेने दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीस्वार तरुण जखमी
शहरातील रावेर-बर्‍हाणपूर रस्त्यावरील तुराब अली ट्रेडर्ससमोर रविवार, 16 रोजी सकाळी 11.30 वाजता भरधाव आयशर (आर.जे.14 जी.एच.8649) ने जोरदार धडक दिल्याने तक्रारदार गौरव दिलीप महाजन (28, खानापूर, ता.रावेर) यांचा दुचाकीस्वार भाचा मयूर महाजन जखमी झाला. या प्रकरणी आयशर चालकाविरोधात रावेर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक अतुल तडवी करीत आहेत.