चाळीसगाव । चाळीसगाव-कन्नड रोडवर असलेल्या तालुक्यातील रांजणगाव शिवारातील महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या हवालदाराला 26 मार्च रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनरने धडक दिल्याने हवालदाराचा जागीच मृत्यू झाला असूल कंटेनर चालक मात्र काही अंतरावर कंटेनर सोडूनन फरार झाला आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव कन्नड रोडवर रांजणगाव शिवारात महामार्ग पोलीस मदत केंद्र आहे. या मदत केंद्रावर पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती असते वाहनांची तपासणी करणे, अपघातावेळी मदत करणे, वाहतुक जाम झाल्यास ती सुरळीत करणे आदी कामे महामार्ग पोलीस कर्मचारी करीत असतात. आज दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास सहकारी कर्मचार्यांसोबत कर्तव्यावर असलेले हवालदार अनिल शालीग्राम शिसोदे (वय-55 रा.डांगरी ता.अमळनेर) हे वाहनांची तपासणी करीत असतांना चाळीसगाव कडुन कन्नड कडे भरधाव वेगाने जाणारे कंटेनर क्रमांक एन एल 01 ए बी 2521 थांबवण्यासाठी प्रयत्न केला असता चालकाने कंटेनर न थांबवता अनिल शिसोदे यांना स्मोरुन धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला व चालकाने तेथे न थांबता तेथुन पलायन केले अपघात होताच सहकारी कर्मचारी यांनी लागलीच कंटेनरचा पाठलाग केला. मात्र थोड्या दुरवर कन्नड घाटाच्या खाली कंटेनर चालकाने रस्त्याच्या कडेला कंटेनर लावुन तेथुन पलायन केले. त्यानंतर त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांनी रुग्णवाहिकेला पाचारण करुन मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. पुढील प्रक्रीया सुरु असुन पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.