भरधाव कंटेनरच्या धडकेत सिंगनूरचे दाम्पत्य ठार

0

मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळील दुर्घटना

मुक्ताईनगर- भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने रावेर तालुक्यातील सिंगनूरचे दाम्पत्य ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास डोलारखेडा फाट्याजवळील पूरनाड-दुई दरम्यानच्या घाशाबर्डी येथे घडली. या अपघातात किरण मानाजी मोरे (40) व संध्या किरण मोरे (36) यांचा जागीच मृत्यू झाला.

कंटेनरची दुचाकीला धडक
दुचाकी (एम.एच.19 जी.टी.8535) ने मोरे दाम्पत्य प्रवास करीत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव कंटेनर (आर.जे.18 जी.बी.2955) ने जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. अपघातग्रस्त वाहने मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.