भरधाव कंटेनर दुकानात घुसला ; दुचाकीस्वार जखमी

0

मुक्ताईनगरजवळील बोदवड चौफुलीवर विचीत्र अपघात

मुक्ताईनगर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बोदवड चौफुली चौकात भरधाव येणार्‍या कंटेनरने दुसर्‍या कंटेनरला धडक दिल्यानंतर ट्रक टायर दुकानात घसल्याची घटना 2 जुन रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. बोदवडकडून मुक्ताईनगरकडे येणारे कंटेनर (आर.जे.18 जीबी 4464) ने मलकापूरकडून भुसावळकडे जाणार्‍या कंटेनर (आर.जे.02 जीबी 0428) धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त कंटेनर बादशहा हॉटेलजवळील बॅटरी व टायरच्या दुकानात शिरल्याने दोघा दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचवेळी दुकानासमोर दुचाकी (एम.एच.बी.बी.7555) वर बसलेला युवक अनिकेत भोई हा जखमी झाला. या विचीत्र अपघातात दोघा कंटेनरचे चालक जखमी झालेले असुन त्याचे नाव, गाव समजू शकले नाही. या प्रकरणी शेख बिलाल शेख इब्राहीम यांचया फिर्यादीवरून कंटेनर (आर.जे.18 जीबी 4464) वरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सादीक पटवे करीत आहेत.