वरूळ:- तर्हाड कसबे-भटाणे रस्त्यावर कांद्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याने ट्रक मधील कांदा रस्त्यावर विखुरल्यने शेतकर्याला मोठा आर्थिक फटका बसला. तर्हाड-कसबे येथील शेतकरी जगदीश कोळी, जगन्नाथ पाटील यांच्या शेतातील पांढरा कांदा ट्रकमध्ये भरून जळगावच्या जैन कंपनीत ट्रक निघालेला ट्रक (एम.एच.18 एम.9481) या वाहनातून नेला जात होता. शनिवारी रात्रभ 12 वाजेच्या सुमारास वाहन उलटल्याने ट्रकमधील 513 कांद्याच्या गोण्या रस्त्यावर विखुरल्या गेल्याने शेतकर्याला फटका बसला. अगोदरच पाणीटंचाईमुळे कांद्याच्या उत्पादनात घट आली असून त्यातच ट्रक उलटल्याने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अपघातात ट्रकचेही नुकसान झाले.