जळगाव : जळगावकडून भादलीकडे जाणार्या मोटारसायकला समोरून येणार्या भरधाव कारने आसोदारोड गौरव हॉटेलजवळ जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील तीघे जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास घडली असून तिघांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात एक महिलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतिष भीमराव कोळी (वय-24), तुळसाबाई भीमराव कोळी (वय-45) आणि भुषण सुनिल शिंदे-कोळी (वय-24) हे तिघेजण मुलगी बघण्याचा कार्यक्रम आटोपून मोटारसायकलने तीघेजण भादली (आसोदा) घरी परतत असतांना आसोदाजवळील गौरव हॉटेलजवळ येथे भादलीकडून जळगावकडे येणार्या कार क्र. (एमएच 19 सिके 501) ने समोरून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील तिघेजण गंभीर रित्या जखमी झाले. तिघांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.
दोघांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल
दरम्यान यातील सतिष भीमराव कोळी याच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड मोडले गेल्याने जिल्हा रूग्णालयात प्राथमोचार करून त्यांना खासगी रूग्णालयात हलविण्यात आले तर तुळसाबाई भीमराव कोळी हे देखील गंभीर जखमी असून त्यांनाही खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान कारवर साई नाव लिहिले असल्याकारणामुळे जिल्हा रूग्णालया परीसरात ही कार हॉटेल साई पॅलेस यांच्या मालकीचे चर्चीले जात होते. महत्वाची बाब म्हणजे कारमध्ये बसणारे चौघेजण हे मद्यप्राशन केल्याचे देखील बोलले जात आहे.